अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या पोस्टरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनने त्याच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
हे पोस्टर चाहत्यांना खूप आवडले आहे. अल्लू अर्जुन या नवीन पोस्टरमध्ये स्वॅग अवतारात दिसत आहे.
चाहत्यांनी केले पोस्टरचे कौतुक
अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत. अल्लू अर्जुनला त्याच्या चित्रपटासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एका यूजरने सांगितले की, मी या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरा यूजरनेही पुष्पा पुष्पराज हे नाव पुरेसे आहे असे म्हटले आहे.
हा चित्रपट डिसेंबरमध्ये होणार प्रदर्शित
पुष्पा चित्रपटाची गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली आहेत. या चित्रपटातील रश्मिका मंदान्नाची भूमिका पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. कथेवर प्रलंबित कामामुळे, निर्मात्यांनी रिलीजची तारीख डिसेंबरपर्यंत वाढवली. येत्या ६ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते.
रश्मिकाही पुन्हा सिनेमात झळकणार
चित्रपटाचे प्रदर्शन आता अगदी जवळ आले आहे. रिलीज होण्यासाठी 100 पेक्षा कमी दिवस उरले आहेत. या चित्रपटाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार आहे. सुकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चित्रपटातील गाणीही चाहत्यांना खूप आवडली आहेत.