-7 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

spot_img
spot_img
spot_img

मॅन्युअल कारवर ऑटोमॅटिक कार वरचढ, वाढत्या विक्रीमागील नेमके कारण काय?

ध्या देशभरात अनेक कार्स लाँच होत आहे. यामध्ये काही कार्स ऑटोमॅटिक असतात तर काही मॅन्युअल. काळानुसार ग्राहकांच्या कार्सबद्दल असणाऱ्या अपेक्षा बदलत आहेत. हल्ली अनेकजण ऑटोमॅटिक कार विकत घेण्याकडे जास्त पसंती दर्शवतात.

यामुळेच ऑटोमॅटिक कार्सच्या विक्रीत सुद्धा कमालीची वाढ बघायला मिळाली आहे. एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये आता मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारला अधिक पसंती दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत ऑटोमॅटिक कारची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. यामागील कारण म्हणजे ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे आणि सोयीस्कर असते. याशिवाय कठीण परिस्थितीतही ही कार चालवताना त्यांचे इंजिन बंद होत नाही.

ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे आहे, त्यामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. मात्र, त्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांना काही फरक पडत नाही. एका अहवालानुसार, 2020 मध्ये कारच्या एकूण विक्रीत ऑटोमॅटिकचा वाटा 16 टक्के होता. जे आता 26 टक्के झाले आहे. Jato Dynamics च्या अहवालानुसार, 20 मोठ्या शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन कार्सपैकी एक ऑटोमॅटिक आहे.

सध्या देशातील सर्वात बेस्ट ऑटोमॅटिक कार ही Datsun redi-GO आहे. यात 999 सीसी इंजिन आहे. एका लिटर पेट्रोलमध्ये ही कार 22 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही 5 सीटर कार 6 कलर ऑप्शनसह येते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एक्स-शोरूम किंमत 4.96 लाख रुपये आहे. तर त्याच्या मॅन्युअल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 3.98 लाख रुपये आहे. या किंमती तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकतात.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या