माजलगाव / प्रतिनिधी :
माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी उद्या शासकीय तंत्र प्रशाला केंद्र केसापुरी येथे होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण २८ फेऱ्या होणार आहेत. आणि २९ वी फेरी केवळ एका टेबलवर होणार आहे.
त्यात १४ ईव्हीएम टेबल आहेत. सहा पोस्टल काउंटिंग टेबल आहेत. आणि एक इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समीटर पोस्टल बॅलेट चा टेबल आहे. या मतमोजणीसाठी दोन रूम आहेत.
एक रूम हे पोस्टल बॅलेट काउंटिंग साठी आहे. आणि एक ईव्हीएम काउंटिंग साठी आहे. असेच यासाठी एकूण टेबलवर काम करण्यासाठी एक सूक्ष्म निरीक्षक, पर्यवेक्षक, आणि सहाय्यक याप्रमाणे मतमोजणी १४ टेबलवर तर पोस्टलची सहा टेबल याप्रमाणे कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील २२९ माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी काउंटिंग ऑब्झर्वर बघून श्री मनोज कुमार (बिहार) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचा मोबाईल क्रमांक ७००४३७७९१९ असा असून ते २१/११/२०२४ रोजी मतदारसंघात आले आहेत. मतदार संघात त्यांचा निवासाचा पत्ता हा शासकीय विश्रामगृह सूट क्रमांक एक बायपास रोड माजलगाव असा आहे. अशी माहिती २२९ माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री गौरव इंगोले यांनी दिली आहे.