-7 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

spot_img
spot_img
spot_img

लिमरा हॉस्पीटल तर्फे २६ व २७ नोव्हेंबर दरम्यान सर्व रोग निदान तपासणी महाशिबीर

औरंगाबाद : (प्रतिनिधी) औरंगाबाद येथील प्रसिध्द फॅमिली फिजिशियन डॉ. शहा आता आपल्या फुलंब्री शहरात मॉ. अपशान मेडीकल अॅण्ड मल्टीपर्पज फौंडेशन सोसायटी, औरंगाबाद संचलित लिमरा हॉस्पीटल अॅण्ड पब्लीक पॉलीक्लिनीक यांच्या वतीने सर्व रोग निदान तपासणी महाशिबीर चे आयोजन दिनांक मंगळवार व बुधवार दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान, सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत. आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये स्त्रीरोग निदान व उपचार, मुळव्याध वर १००% आयुर्वेदिक उपचार व ऑपरेशनची सुविधा, त्वचा रोग, सांधेवात, शुगर, दमा, ब्लड प्रेशर, गुडघे दुखी, कंबर दुखी. जुन्यात जुने दुखणे (विना मेडीसीन उपचार), पिवळा काविळ, टायफाईड, मुतखडावर विना ऑपरेशन उपचार, मलेरीया, डेंगु, टि.बी., थायरॉईड, दाग, खाज, खुजली, फंगल इंफेक्शन, फिजीओथेरपी, अॅक्युप्रेशर, हिजामा (कपिंग थेरपी), आयुर्वेदीक, अॅलोपॅथीक, युनानी इत्यादी या आजारांवर उपचार करण्यात येतील असे डॉ. तालेब शहा, डॉ. नसरीन शहा, डॉ. आजम शहा यांनी कळवले आहे.

या कॅम्प मध्ये गर्भवती महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. या ठिकाणी तपासणी करण्याकरीता महिला डॉक्टर उपलब्ध आहे. या िठकाणी बालाजी मेडीकल तर्फे सर्व प्रकारची औषधी सवलतीच्या दरातही सवलत मिळणार आहे. दर रविवारी सर्व औषधीवर १५-२० % सवलत देण्यात येणार आहे.

शिबीरामध्ये मोफत साखर तपासणी जेवणा आधी व जेवनानंतर व इतर सर्व तपासण्यावर ५०% सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत लिमरा हॉस्पीटल, आंबेडकर चौक औरंगाबाद मो. 8788425605 व लिमरा हॉस्पीटल बालाजी मेडीकल जवळ, तावडे कॉम्प्लेक्स, बस स्टॅण्डच्च्या बाजुला, अजिंठा रोड, फुलंब्री मो. 9921022039, 8080432028 या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तरीही परीसरातील गरजू नागरिकांनी मोफत आयोग्य शिबिराचा फायदा घ्यावा असे डॉ. तालेब शहा, डॉ. नसरीन शहा आणि डॉ. आजम शहा यांनी कळवले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या